आम्हालाच का ??? निवडून दया !!!








 प्रिय मतदार बंधू भगिनींनो,
सप्रेम नमस्कार,
'कर्जतचा सर्वांगीण विकास' हे एकच ध्येय समोर ठेऊन कर्जत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर येत आहोत. कर्जत ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या माध्यमातून पाणी, वीज, रस्ते, शिक्षण,आरोग्य या सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देताना आजपर्यंत अनेक योजना राबविल्या.
सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न! गेल्यावर्षी थेरवडी तलावात पाणी नसतानाही कर्जतकरांना पुरेशा पाण्याचा पुरवठा केला.
याही वर्षी हा प्रश्न गंभीर बनलेला असताना सर्वांना बरोबर घेऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाणी देण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत.
शहराच्या सर्वांगीण विकासास पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. कर्जत तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी तसेच थेरवडी तलावात पिण्याचे पाणी व थेरवडी तलावाखालील शेतकर्‍यांच्या शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून आजपर्यंत अनेक वेळा रास्ता रोको, उपोषण, आंदोलने केली.आजपर्यंत कर्जत गटातील शेतकर्‍यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांच्या वाट्याला अतिशय हालाखीचे जीवन आले आहे. या समस्या दूर करण्यासाठी बंधार्‍याची निर्मिती, शेतकर्‍यांसाठी विविध विकास योजनांची अंमलबजावणी, रस्ते डांबरीकरण या कामांना प्राधान्य देणार आहोत.
कर्जत जिल्हा परिषद गटातील वाड्यावस्त्यांना जोडणार्‍या रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून, त्याचा त्रास सर्वसामान्यांना होत आहे. पाण्याच्या समस्येबरोबरच रस्त्यांची समस्या दूर करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
खा. दिलीपजी गांधी,मा. आ. सदाशिव लोखंडे व आ.प्रा. राम शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून आजपर्यंत कर्जत गटामध्ये हातपंप, व्यायामशाळा, सभामंडप, शाळाखोल्या अंतर्गत गटार, अंतर्गत डांबरीकरण, रस्ते इत्यादी कामे केली आहेत. सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देत कधीही विरोधाला विरोध न करता विकासाला साथ या पध्दतीने आम्ही काम केले म्हणूनच आजपर्यंतच्या राजकीय जडणघडणीत मला आपली भरभरून साथ मिळालेली आहे.
कर्जतच्या विविध समस्यांसाठी संघर्ष केलाय यापुढेही तो चालूच राहील. अनेकांना व्यवसाय उभे करण्याची संकल्पना दिली. तरुण इतरत्र भरकटणार नाहीत याची नेहमीच काळजी घेतली. विविध प्रश्नांची सोडवणूक करताना कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. संकटकाळी अनेकांना मदत केली. तरुण वर्गात एकी कशी राहील यासाठी नेहमीच प्रयत्न केले. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. सर्वांना मुलभूत सुविधा मिळाव्यात हाच माझा मानस आहे. मतदार बंधू भगिनींनी या निवडणुकीत विश्‍वास दाखवावा. मी त्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही असे मी वचन देतो.
खासदार, आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून श्री. नामदेव राऊत यांच्या प्रयत्नातून खालील गावात झालेली विकास कामे गावे व विकास कामे-निंबे-हातपंप, खंडाळा/ गोयकरवाडा- हातपंप, व्यायामशाळा, अळसुंदे- ग्रा.पं. व्यासपीठ, हातपंप, सभामंडप, नेटकेवाडी- ग्रा.पं. व्यासपीठ, हातपंप, बसस्थानक, देमनवाडी- ग्रा.पं. व्यासपीठ, शाळा खोली, बालवाडी खोली, हातपंप, कापरेवाडी- शाळा कंपाऊंड, कर्जत- कापरेवाडी डांबरीकरण रस्ता, शिंदेवाडी- शिंदेवाडी- म्हस्केमळा खडीकरण रस्ता, शिंदेवाडी सेतू पूल, कुंभेफळ-नवले वस्ती हातपंप, शाळा खोली, थेरवडी- हातपंप, बेनवडी फाटा ते गाव डांबरीकरण, सभागृह, थेरवडी ते शेवाळेवस्ती रस्ता, गायकरवाडी- खडीकरण रस्ता, कोरेगाव- अंतर्गत डांबरीकरण, सभामंडप, सटवाईवाडी- पाणी पुरवठा, सटवाईवाडी रस्ता, वडगाव- व्यायाम शाळा, बेनवडी-सभामंडप, शाळा खोली, धांडेवाडी- सभामंडप, अंतर्गत गटार, रेहेकुरी- व्यायामशाळा, सभामंडप, बजरंगवाडी- शाळाखोली, पाईपलाईन, हातपंप, कोळवडी-सभागृह, पठारवाडी- सभामंडप, बहिरोबावाडी- शाळाखोली, हातपंप, अंतर्गत डांबरीकरण, समाजमंदीर, सभामंडप, भांडेवाडी- व्यायामशाळा, हातपंप, सावतामाळी कंपाऊंड, सभामंडप, गटर, जोगेश्‍वरवाडी- हातपंप, व्यायामशाळा, शाळाखोली, अंतर्गत पाईपलाईन, सभामंडप, कर्जत- बाजारतळ डांबरीकरण, बुवासाहेब नगर व उपनगरे पाईप लाईन, ढेरेमळा- रजपूतमळा डांबरीकरण, शहाजीनगर डांबरीकरण, शाळाखोली, समाज मंदीर, सभामंडप, ग्रा.पं.कर्जतची थेरवडी पाणी योजनेची विहीर. मा. आ. सदाशिवरा लोखंडे यांच्या विकास निधीतून व नामदेव राऊत यांच्या प्रयत्नातून कोरेगाव अंतर्गत डांबरीकरण व कळंबवृक्ष दत्त च् आपल्या अपेक्षांचे ओझे माझ्यावर आहे याची जाणीव ठेऊन मी वाटचाल करत आहे. त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मी प्रथमच कर्जत गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवित आहे. माझ्याबरोबर कर्जत पंचायत समिती गणातून सौ.कांताबाई बापूसाहेब नेटके व कोरेगाव पंचायत समिती गणातून श्री. अंगद आजीनाथ रूपनर हे उमेदवारी करीत आहेत. हे दोन्ही उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील व त्यांची जनतेशी प्रत्यक्ष नाळ जोडलेली आहे. या दोन्ही गणातील उमेदवारांनी सर्वसामान्य नागरिकांच्या सुख दु:खात सहभागी होऊन त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपले सर्वांचे आशीर्वाद व तरुण सहकार्‍यांच्या बळावर तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडवून कर्जत गटाचा सर्वांगीण विकास करण्यास आम्ही वचनबध्द आहोत!